जिल्ह्यात दिवसभरात 977 कोरोनाबाधित

शनिवारी उपचारादरम्यान 21 जणांचा मृत्यू : 809 जण कोरोनामुक्त; एकूण रुग्णसंख्या 30,092
Published:Sep 19, 2020 04:43 PM | Updated:Sep 19, 2020 04:43 PM
News By : Muktagiri Web Team
जिल्ह्यात दिवसभरात 977 कोरोनाबाधित

जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढू लागला आहे. शनिवारी दिवसभरात 977 जण कोरोनाबाधित झाले तर 21 जणांचा उपचादरम्यान मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे 809 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 19,866 जण कोरोनामुक्त झाले आहेत.