भाषा विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी अनुवाद क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी

विजय मांडके : तळमावलेच्या काकासाहेब चव्हाण कॉलेजमध्ये ‘अनुवादक करिअरची नवी संधी’ कार्यशाळा संपन्न
Published:Feb 28, 2021 12:05 PM | Updated:Feb 28, 2021 12:05 PM
News By : Muktagiri Web Team
भाषा विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी अनुवाद क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी

‘अनुवादक हे वेगाने विस्तारणारे करिअर आहे. ज्या विद्यार्थ्यांचे भाषेवर प्रभुत्व आहे आणि ज्यांना करिअरच्या वेगळ्या वाटेवर जायचे असेल त्यांनी ‘अनुवाद’ या क्षेत्राचा नक्कीच विचार करावा. त्यात अर्थार्जन तर होईलच; परंतु वेगवेगळ्या विभाग, प्रदेश, देशांचा सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक असा अभ्यासही त्यातून करता येईल,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके यांनी केले.