शेतातील झोपडीत वीज कोसळून दोघे ठार

खंडाळा तालुक्यातील कवठेतील घटना : जेवायला बसले असतानाच काळाचा घाला 
Published:May 02, 2021 08:02 PM | Updated:May 02, 2021 08:02 PM
News By : Muktagiri Web Team
शेतातील झोपडीत वीज कोसळून दोघे ठार

कवठे, ता. खंडाळा येथे झोपडीवर वीज कोसळून जेवायला बसलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. शशिकांत दादासाहेब लिमन (वय 35, रा. झगलवाडी, ता. खंडाळा) व खाशाबा भाऊसाहेब जाधव (वय 60, रा. कवठे, ता. खंडाळा) अशी त्यांची नावे आहेत.