वाचन संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहिती समृद्ध समाजाची जडणघडण, व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास,भाषा विकास करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष मांढरे यांनी केले
रहिमतपूर दि 21प्रतिनिधी:- वाचन संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहिती समृद्ध समाजाची जडणघडण, व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास,भाषा विकास करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षक संतोष मांढरे यांनी केले. ते रहिमतपूर येथील हिंद नगरवाचनालय व ग्रंथालय रहिमतपूर या ग्रंथालयातर्फे माजी राष्ट्रपती भारतरत्न, मिसाईल मॅन डॉ.ए .पी.जे.अब्दूलकलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्त शालेय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.त्याचे बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी रहिमतपूर विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम हे होते.यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे, उपनगराध्यक्ष बेदिल माने, विश्वस्त विद्याधर बाजारे,प्रा.भानुदास भोसले,आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना संतोष मांढरे पुढे म्हणाले की, अब्दुल कलाम यांची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ठाम आत्मविश्वास असणाऱ्या डॉ कलाम यांचे विविध पैलू होते.नितळ मन, आणि दिलदार स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य होते.देशाच्या युवा पिढीला त्यांनी आपल्या विचारांनी आणि कर्तृत्वाने भारावून टाकले होते.भारत हा नक्कीच महासत्ता बनेल.हा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात निर्माण केला होता.अब्दूल कलाम यांची पुस्तके वाचावीत, विद्यार्थी विद्यार्थ्यीनी यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचन प्रेरणा हिंद नगरवाचनालय व ग्रंथालयातर्फे दिन साजरा केला जातो हा स्तुत्य उपक्रम आहे. निबंध स्पर्धेत 171हून आधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. लहान गटात (ई.5वी ते8वी) प्रथम क्रमांक 700/-रू. पुर्वा दादासो लोहार जि. प. प्राथमिक शाळा नहरवाडी विषय आपलं रहिमतपूर,द्वितीय क्रमांक500/-रू. भिसे श्रावणी अमोल आदर्श विद्यालय रहिमतपूर विषय माझा आवडता खेळाडू ,तृतिय क्रमांक 300/-कदम नंदिनी किशोर आदर्श विद्यालय रहिमतपूर विषय. आपलं रहिमतपूर मोठ्या गटात प्रथम क्रमांक 1000/-रू.पवार ओंकार मानसिंग वसंतदादा पाटील विद्यालय रहिमतपूर ई10वी विषय गाव तिथे वाचनालय, द्वितीय क्रमांक 700/-रू.सावंत पायल शंकर ई 9वी डॉ.वा.गो. परांजपे विद्यालय रहिमतपूर विषय माझा आवडता साहित्यिक तृतीय क्रमांक 500/-रू. चव्हाण समीक्षा दत्तात्रय ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स रहिमतपूर विषय मी वाचलेले पुस्तक श्यामची आई, यावेळी रोख रक्कम व प्रशस्तीपत्र व हॅण्ड बुके देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सहभाग घेतलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी राष्ट्रपती मिसाईलमॅन भारतरत्न डॉ एक पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सौ. उर्मिला जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक प्रा.विकास पवार यांनी केले.सुत्रसंचालन विश्वस्त विद्याधर बाजारे यांनी केले.आभार विश्वस्त बेदिली माने यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय जंगम,कु.उमा सावंत, श्रीमती शैलजा गोरेगावकर, निकिता घोलप, यांनी परिश्रम घेतले.