शंभू महादेवाचे मंदिर बंद असल्यामुळे या परिसरातील लोकांना प्रचंड अडचण निर्माण झालेली होती. जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याची भावना असणारे येथील लोकांना अडचणीच्या काळात सामाजिक व दानशूर लोकांकडून जीवनावश्यक वस्तूंचे किट आणून देणारे सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे सर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी ठेवून साजरा करण्यात आला. मंदिर परिसरातील पुजारी व गरजू कुटुंबांना त्यांनी 700 किलो ज्वारी वाटून वाढदिवस साजरा केला.
शिखर शिंगणापूर, ः शंभू महादेवाचे मंदिर बंद असल्यामुळे या परिसरातील लोकांना प्रचंड अडचण निर्माण झालेली होती. जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्याची भावना असणारे येथील लोकांना अडचणीच्या काळात सामाजिक व दानशूर लोकांकडून जीवनावश्यक वस्तूंचे किट आणून देणारे सामाजिक कार्यकर्ते वीरभद्र कावडे सर यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी ठेवून साजरा करण्यात आला. मंदिर परिसरातील पुजारी व गरजू कुटुंबांना त्यांनी 700 किलो ज्वारी वाटून वाढदिवस साजरा केला.
शंभू महादेवाचे मंदिर बंद असल्यामुळे भाविक येत नसल्यामुळे येथील पुजारी दुकानदार लोकांमध्ये उपजीविका करताना अडचणी निर्माण होत आहेत. लोकांना शासनाच्यावतीने गहू, तांदूळ, रेशनिंगवर मिळत आहे. याठिकाणी स्वतःच्या शेतातील उत्कृष्ट ज्वारी 700 किलो 100 कुटुंबांना मोफत देण्यात आली. यावेळी माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिथुन कर्चे, चेअरमन बाळासाहेब भोसले खादी ग्रामोद्योगचे संचालक प्रभाकर माने, पत्रकार धनंजय कावडे, घडशी समाजाचे उमेश पवार, विठ्ठल पवार, दादा पवार, कैलास पवार, उत्तम पवार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर गरीब व गरजू लोकांना ज्वारीचे वाटप केले. गोरगरीब लोकांना स्वतःच्या शेतातील ज्वारी मोफत वाटप करून आमची वेळ भागवली त्याबद्दल त्यांना दीर्घायुष्य लाभावे, अशा शब्दांत लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.