‘’ऐसा अधिकारी होणे नाही” - सर्वसामान्यांचे सेवक, कार्यक्षम पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाढे यांनी बदली
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
पाटणसारख्या डोंगरी, आपत्तीग्रस्त भागात शासनाच्या योजना शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पोहोचवणारे, शैक्षणिक दाखले तत्परतेने पुरवणारे, महसूल व्यवस्थेतील उत्तम प्रशासक, समाजातील सर्व स्तरातील लोकांना सांधणारा दुवा, जन मनात आपले अढळ स्थान निर्माण करणारा ध्रुव तारा सर्वांचे लाडके, आवडते, लोकप्रिय व्यक्तिमत्व पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनील गाडे यांनी बदली झाली आहे. आपल्या कार्यकौशल्यामुळे श्री. गाडे यांनी सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान मिळवल्याने “ऐसा अधिकारी होणे नाही” असेच म्हणावे लागेल. पुणे येथे उपजिल्हाधिकारी भूसंपादन पदाचा कार्यभार त्यांना देण्यात आल्याचे परिपत्रक शनिवारी राज्याचे उपसचिव महेश वरूडकर यांनी काढले आहे.
पाटण तालुक्यातील तीन वर्षाच्या कार्यकालात प्रांताधिकारी सुनिल गाढे यांनी महत्वपूर्ण आणि भरीव कामगिरी केल्यामुळे सर्वसामान्यं जनतेच्या मानामध्ये आदराचे स्थान निर्माण केले होते. पाटणमधील कातकरी कुटुंबांस शासनाच्या योजनांचा लाभ थेट वस्तीवर जाऊन देऊन त्यांना विकासाच्या मुख्यप्रवाहात आणले. तसेच रॅलीद्वारे मतदार जागृती करून सदोष मतदारा यादीत तयार केली. याचबरोबर महत्वपूर्ण असणारे कुणबी दाखल्याचे घरोघरी जाऊन वाटप केले. स्पर्धा परिक्षांसाठी लागणारे सर्व प्रकारचे दाखले तत्परतेने विद्यार्थ्यांना देऊन त्यांची गैरसोय टाळली. याचबरोबर विविध रस्त्यांचे प्रश्न, साकव पुलाचे प्रश्न त्यांनी सोडवले. यासह वंचित घटकांना न्याय देण्याचे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केल्यामुळे त्यांनी सर्वसामान्यांच्या हृदयात स्थान मिळवले.
तसेच आपल्या सहकाऱ्यांना प्रचंड बळ देणारे, सकारात्मक उर्जा देणारे एक उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा कार्यकाल सर्वाच्या आठवणीत राहणारा आहे.