साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमध्ये एचपीव्ही लसीकरणाला उस्फुर्त प्रतिसाद
News By : Muktagiri Web Team
सातारा - भारतात दरवर्षी 30000 हजार पेक्षा जास्त अधिक महिलांना गर्भाशय पिशवीचा कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. महिलामध्ये आढळणाऱ्या कर्करोगामध्ये दुसऱ्या क्रमाकावरील असलेल्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे (सर्व्हायकल कॅन्सर) प्रमाण एचपीव्ही (हयुमन पॅपिलोमा व्हायरस) या प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे लक्षणीयरीत्या घटले आहे. प्रतिबंधात्मक लस उपलब्ध असलेला गर्भाशय मुखाचा कर्करोग हा एकमेव कर्करोग आहे. या लसीचा लाभ महिलांना मिळवून देण्यासाठी साताऱ्यातील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर तसेच कॅन्सर पेशंट एड असोसिएशन (सीपीएए) मुंबई यांचा संयुक्त विद्यमाने मोफत एच. पी. व्ही लसीकरण मोहिम राबविण्यात आली असून या मोहिमेला किशोरवयीन मुली तसेच तरुण वयोगटातील महिलांकडून उत्तम प्रतिसाद लाभला.
सुमारे १२०० तरुणींनी या मोहिमेत आपला सहभाग नोंदविला. गर्भाशय मुखाचा म्हणजेच सर्व्हायकल कॅन्सर हा ह्युमन पॅपिलोमा या विषाणुमुळे होतो. एचपीव्ही लसीमुळे विषाणूचा सपूर्ण नाश होतो, मात्र त्यामार्फत होणारा संसर्ग जवळजवळ नष्ट होतो, असे निरिक्षण या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या लसीकरण कार्यक्रमांतर्गत शंभरपेक्षा अधिक देशांनी एचपीव्ही लसीचा वापर सुरू केला आहे.
९ ते ४५ या वयोगटांत ही लस घेता येऊ शकते.२०ते ४५ ह्या वयोगटातील महिलांना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे . लसीकरण शिबीर प्रसंगी ऑन्को लाईफ हॉस्पिटल्स चे अध्यक्ष श्री उदय देशमुख संचालक डॉ प्रताप राजेमहाडिक सीपीएएच्या संचालिका डॉ धनंजया सारनाथ यांची उपस्थिती होती.तसेच लसीकरण शिबीर यशस्वी होण्यासाठी डॉ प्रसाद कवारे ,डॉ मनीषा मगर ,मनीषा कारंडे ,सारिका बल्लाळ ,रुपाली साळुंखे यांनी परिश्रम घेतले.