सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी मोठा राडा झाला होता. पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे संतापलेले शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सातारा राडा प्रकरणी नाराजी बोलावून दाखवली होती. तसेच शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांकडून तुषार दोशी यांना निलंबन करण्याची मागणी केली होती. मात्र यानंतरही तुषार दोशी पोलीस अधिक्षक कार्यालयात दाखल झाले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना भोवले आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोशी अर्जित रजेवर गेले आहेत. तोपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.