म्हसवड प्रतिनिधी
देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर अहोरात्र दक्ष असणाऱ्या भारतीय संरक्षण सेवेतील जवानांना क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेच्या विद्यार्थीनीनी हाताने बनवलेल्या राख्या.सीमेवरील जवानांना रक्षाबंधनाची अनोखी भेट बहिण भावांचा ऋणानुबंध दृढ करणारा हा सण मानला जातो
संरक्षण सेवेमध्ये असणाऱ्या तसेच देशाच्या सीमेवर मातृभूमीची सेवा बजावणाऱ्या तसेच अहोरात्र दक्ष असणाऱ्या जवान बांधवांसाठी क्रांतिवीर शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो राख्या बनविण्यात आल्या . यातील निवडक आकर्षक 525 राख्या काश्मीर सीमेवरील पहलगाम, लडाख भागात कार्यरत असणाऱ्या सैनिक बांधवांसाठी सदर रेजिमेंटच्या ठिकाणी पोस्टद्वारे नुकत्याच पाठवण्यात आल्या.
या कामी सातारा जिल्हा सैनिक कल्याण बोर्डाचे माजी अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल भानुदास जरे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना बाबर व शिक्षक यांनी राबवला. उपक्रमात क्रांतिवीर शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी सहभागी झाले होते. वैशिष्ट्यपूर्ण अनोखा उपक्रम राबविल्याबद्दल संस्था अध्यक्ष कृषिरत्न प्रा.विश्वंभर बाबर, शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले.