प्रा. शौकत आतार यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.*
News By : Satara
देऊर(प्रतिनिधी) श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित आर्ट्स, कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेज, नागठाणे येथील हिंदी विभागप्रमुख प्रा. शौकत आतार यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथून हिंदी विषयामध्ये पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.
प्रा. शौकत आतार यांनी ‘हिंदी के प्रतिनिधि साहित्यिक साक्षात्कारों का अनुशीलन (साक्षात्कार विधा के परिप्रेक्ष्य में)’ या विषयावर संशोधन केले. छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा येथील हिंदी विभागातील असोसिएट प्रोफेसर प्रा. डॉ. संदीप जोतिराम किर्दत यांचे मार्गदर्शन लाभले.
या संशोधनासाठी ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे, प्रो. (डॉ.) अर्जुन चव्हाण तसेच हिंदी विभागप्रमुख प्रो. (डॉ.) तृप्ती करेकट्टी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रा. शौकत आतार यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सहसचिव (अर्थ) प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, सहसचिव (प्रशासन) प्राचार्य श्री. सिताराम गवळी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे, संस्थेचे माजी सहसचिव प्राचार्य डॉ. अशोक करांडे, महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. महेश गायकवाड तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.


