सातारा हिल रनर्सचा द्वितीय वर्धापनदिन उत्साहात
News By : Muktagiri Web Team
सातारा, दि. ६ (प्रतिनिधी) -
आरोग्य, व्यायाम व धावण्याच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा नसार करत असलेल्या सातारा हेल रनर्स या समूहाचा द्वितीय वर्धापनदिन स्वराज मंगल कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला.
डॉ. सुधीर पवार यांच्या नार्गदर्शनाखाली दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या उपक्रमाने अल्पावधीतच सातारा परिसरातील नागरिकांमध्ये धावणे, नियमित व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैलीची आवड निर्माण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. प्रारंभी छोट्या स्वरूपात सुरू झालेल्या या : वर्धापनदिन कार्यक्रमास उपस्थित डॉ. सुधीर पवार, डॉ. सौ.
उपक्रमाचे रूपांतर वटवृक्षात झाले असून, विविध वयोगटांमधील धावपटू या आरोग्य चळवळीत सहभागी झाले आहेत.
सातारा हिल रनर्सच्यावतीने नियमित वर्कआउट, धावण्याचे प्रशिक्षण आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन, धावपटूंना प्रोत्साहन
देणे, त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणे यावर विशेष भर दिला जात आहे. वर्धापनदिन कार्यक्रमास सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे पदाधिकारी, स्वास्थ्यन फिटनेस व स्वयंभू फिटनेसचे पदाधिकारी उपस्थित होते. वर्षभर नियमित वर्कआउट
नीलिमा पवार व इतर.
करणार्या सदस्यांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या धावपटूंचाही सन्मान करण्यात आला. प्रथमच आयोजित दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांमधील विजेते व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना
ट्रॉफी देण्यात आल्या.
धावण्याची चळवळ रुजवण्यासाठी मानधन न घेता सेवा देणाऱ्या डॉ. सुधीर पवार व डॉ. सौ. नीलिमा पवार यांचा सन्मान करण्यात आला. मावळ्याच्या वेषभूषेत आलेल्या डॉ. सुधीर पवार यांना मानपत्र आणि ढाल-तलवार देण्यात आली. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. हिंदी व मराठी गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढली. संपदा घाटगे, चंद्रकांत पवार, चिंतामणी कोठावळे, भद्रेश शहा यांनी सूत्रसंचालन केले. सातारा हिल रनर्स समूहाचे सदस्य, कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते.


