वृत्तपत्र विक्रेता : लोकशाहीचा पहाटेचा शिलेदार
सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा
News By : Satara
पहाटेच्या शांत झोपेत शहर असते. रस्त्यावरील वर्दळ कमी अन् बाजारपेठ बंद असते. पण इथूनच वृत्तपत्र विक्रेत्याचा प्रवास सुरू होतो.वृत्तपत्र विक्रेत्यांचे योगदान अनमोल! वृत्तपत्र म्हणजे समाजाचा आरसा. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, शेती, क्रीडा, विज्ञान, संस्कृती आणि देश-विदेशातील घडामोडी यांची माहिती वृत्तपत्रांमधून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचते. या माहितीचा प्रवास पूर्ण करण्यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा मोठा वाटा असतो. 15 ऑक्टोबर वृत्तपत्र विक्रेता दिन व डॉ. एपीजे अब्दुल कलाम जयंती. त्यानिमित्त सर्वत्र वाचन चळवळ व विक्रेता दिन साजरा केला जातो. आज सातारा शहरात सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट संघटनेच्या वतीने वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. एपीजे अब्दुल कलाम व जगन्नाथ जी कोठे कर साहेब यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व एजंट संघटनाकडून वृत्तपत्र विक्रेत्यांना पेढे वाटप करण्यात आले. तसेच दैनिकांचे सर्व प्रतिनिधी त्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.
यावेळी सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेत्या संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र माळी यांनी विक्रेत्या दिनाच्या औचित्य साधून आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी स्टॅन्ड डेपो उपाध्यक्ष ताजुद्दीन आगा व राज्य संघटना सचीव गणेश पवार, तुषार खांडेकर, लहूराज लवळे,विकास क्षीरसागर, गणेश भोरे,रमेश जाधव, सचिन लबडे,सुदर्शन पोळ, प्रवीण शिंदे, विनोद शिंदे,युवराज आगलावे,समीर आतार, शब्बीर आतार,सुधीर पांढरे. जुबेर शेख उपस्थित होते.
सातारा राजवाडा डेपो येथेही प्रतिमा पूजन करून विक्रेता दिन साजरा करण्यात आला. यावेळी उमाजी निकम, महेश पवार, संतोष फरांदे, विशाल भुजबळ, अभिजित पडललू, अभिजित रसाळ, सतीश गाडे, अभय व्हावळ, विजय महामुनी, विजय कुंभार, गणेश जायगुडे, संदीप गायकवाड, नौशाद शेख, विनायक गायकवाड, शिवाजी माने, सतीश धडवई,जाकीर शेख, अवधूत लोहार, सतीश गजधरणे, लोखंडे बापू उपस्थित होते.


