रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2026 चा मान्यवरांच्या हस्ते उद्या शानदार शुभारंभ
पोलीस परेड ग्राऊंड येथे दि. २६ ते २९ नोव्हेंबर रोजी आयोजन
News By : Satara
सातारा - बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेने रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ हे बांधकाम विषयक भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपुर्ण पश्चिम महाराष्ट्राला भूषणावह ठरेल असे रचना २०२६ या प्रदर्शनाचे आयोजन दि. २६ ते २९ नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. भव्य मंडप, सातारकरांनी न पाहिलेले आकर्षक प्रवेशद्वार, लाईट सिसटीम्स् व आकर्षक स्टॉल्स असे या प्रदर्शनाचे आयोजन असून प्रदशर्नाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याचे बिल्डर्स असोसिएशनचे सातारा शाखेचे अध्यक्ष कौस्तुभ मोरे यांनी सांगितले.
रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ प्रदर्शनाचे उद्घाटन गुरूवार दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे नॅशनल प्रेसीडेंट मा.श्री रविंद्र त्यागी, नॅशनल व्हाईस प्रेसीडेंट श्री. महेश मुद्दा, बीएआय चे महाराष्ट्र स्टेट चेअरमन श्री. प्रकाश मेंडा यांच्या हस्ते व बिल्डर्स असोसिएशनचे सातारा सेंटर चेअरमन कौस्तुभ मोरे, व्हाईस चेअरमन हर्षद वालावलकर, सेक्रेटरी निलेश शिंदे, खजिनदार शरद जाधव, कौन्सिल मेंबर संतोषकुमार जगताप, सचिन देशमुख, रामदास जगताप व अन्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
बिल्डर्स असोसिएशन च्या सातारा शाखेचे हे ३६ वे वर्ष आहे, रचना बांधकाम विषयक प्रदर्शन भरवून सर्वसामान्य लोकांना बांधकाम क्षेत्राची, त्यात वापरल्या जाणार्या अनेक मटेरिअल्सची, बांधकामाच्या वेगवेगळया पध्दती, त्यातले तंत्रज्ञान, त्यात वापरली जाणारी वेगवेगळी मटेरिअल्स व या अनुषंगाने गृहअंतर्गत रचना, त्यात उपलब्ध होऊ शकणार्या अनेक सुविधा, सुखसोयी हा एक मोठा उपक्रम बिल्डर्स असोसिएशनची सातारा शाखा यशस्वीपणे राबवीत आहे. रचनाच्या यशस्वी आयोजनाचे हे चौदावे वर्ष आहे. लोकांकडूनही या उपक्रमाला वाढता प्रतिसाद आहे. प्रदर्शनास भेट देणार्यांची संख्याही दरवेळी वाढत आहे. यावेळी सुमारे तीन लाखापेक्षा जास्त नागरिक भेट देतील ही अपेक्षा आहे. या वर्षीचा एकूण प्रतिसाद सर्व स्टॉल धारक व भेट देणारे इच्छुक आणि ग्राहक यांना अडचणीचे होऊ नये म्हणून रचना २०२६ हे भव्यदिव्य बांधकाम विषयक प्रदर्शन पोलीस परेड ग्राउंड या भव्य मैदानावर घेण्यात आले आहे. रचना चे खास वैशिष्ठय धुळीचा त्रास होऊ नये म्हणून संपुर्ण मंडपा मध्ये कार्पेट आहे. तसेच सुसज्ज पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ या प्रदर्शनामध्ये एकूण १००हून अधिक स्टॉल्स्चे नियोजन केले आहे. यामधे नामांकित बांधकाम व्यावसायिक आपले नवीन प्रकल्प सादर करणार आहेत. या प्रदर्शनामध्ये बांधकामास उपयुक्त विविध मटेरियल्स् पाहण्यात मिळतील. तसेच बांधकाम क्षेत्राशी संबंधित अत्याधुनिक मशिनरी ठेवण्यात येणार आहेत. प्रदर्शनाच्या कालावधीमध्ये विविध आकर्षक योजना बांधकाम व्यावसायिक जाहीर करणार आहेत.यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. नवीन फ्लॅटसाठी नोंदणी करणार्या ग्राहकांच्या सेवेत नामवंत वित्तीय संस्था उपलब्ध आहेत. एकाचवेळी एकाच ठिकाणी घर व बांधकाम साहित्य निवडींचे विविध पर्याय ग्राहकांना बघावयास मिळणार आहेत.
रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ हे प्रदर्शन दि. २६ ते २९ नोव्हेंबर दरम्यान आयोजीत केले असून प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 असून प्रवेश विनामुल्य आहे नागरीकांनी https://vms.ruha.co.in/registration/rachana-visitor या लिंकवर रजिस्ट्रेशन करावे रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ चे प्रायोजकत्व स्कॅान इन्फ्रा, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, कंग्राळकर असोसिएटस्, उथ्थान एलिवेटर्स, नवनिर्मिती बिल्डर्स, परफेक्ट हाऊस प्रा.लि.यांनी स्वीकारले आहे.


