रॉयल कारभार ग्रुप कडून कोरोना बाधित रुग्णाला मोफत जेवण
Published:May 12, 2021 11:36 AM | Updated:May 12, 2021 11:36 AM
News By : वडूज प्रतिनिधी I आकाश यादव
सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून सदैव संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग अशी ख्याती झालेल्या महाराष्ट्र भर ख्याती झालेल्या रॉयल कारभार ग्रुपने वेगळा ठसा उमटवला आहे. याबाबत माहिती अशी की कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात रुग्णांना ओकक्सिजन बेड रेमडी सिवर व इतर आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी नातेवायकाना धावाधाव करावी लागते याची जाणीव ठेवून तसेच नातेवाईकांच्या आग्रहाखातर रॉयल कारभार ग्रुपने मित्र परिवाराच्या सहकाऱ्यांनी स्वखर्चाने कोविड उपचार केंद्रात मोफत जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे सद्या कराड परिसरातील आठ ते दहा रुग्णालयात मोफत जेवण पुरवल्यामुळे अनेकांनी तृप्ती चे ढेकर दिले .आहार तज्ज्ञांच्या सल्ल्याने उकडलेली अंडी,भाजी,वरण भात, चपाती ,पाण्याची बाटली आदी साहित्य रुग्णालयात जाऊन वितरित करण्यात येते मनसेचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मनसे जिल्हा स्वयंमरोजगार संघटक सुरज लोहार यांच्या सहकार्यातून महाराष्ट्र राज्य रॉयल कारभार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सौरभ दादा जाधव यांच्या संकल्पनेतून दीड ते दोन लाख रुपये सडल हाताने खर्च झाला आहे. सदर विनामूल्य जेवणासाठी सकाळी दहा वाजेपर्यंत व सायंकाळी सहा च्या अगोदर गरजुनी संपर्क साधणे गरजेचे आहे. रॉयल कारभार ग्रुपचे शिलेदार सुरज पाटोळे, अनिकेत भोसले, नरेंद्र पाटील,प्रशांत पाटील,असिफ सय्यद यांच्यासह अनेक युवा सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत सदरचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात जलदगतीने राबवण्याचा संकल्प स्थानिक कार्यकर्ते घेऊ लागले आहेत. सद्या ज्या ठिकाणी कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे त्याठिकाणी जमावबंदी आदेशनी ताजा भाजीपाला घेऊन येताना पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग, व महसूल विभागाचे सहकार्य लाभत आहे चांगल्या कार्याला नेहमीच सहकार्य लाभत आहे. समाज्यातील एक वर्ग कोविड सेंटर उभारत असताना आपणही खारीचा वाटा म्हणून नोंदणी केलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पौष्टीक आहारामुळे रुग्ण व नातेवायकाना दिलासा मिळाला आहे. या कार्यासाठी रॉयल कारभार ग्रुपचे सदस्य सागर चन्ने ,अजित साळुंखे,सुहास माने,केतन साळुंखे, नितीन कुंभार, अनिकेत साळुंखे, उमेश कदम, अमोल काशीद, संतोष जाधव ,दिनेश कांबळे, ऋषी ठाकूर, तुस्यार जगदाळे, साहिल सुतार,मंगेश दुमाणे ,गणेश रजपूत, विजय दुर्गावले यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. या उपक्रमाबद्दल अनेक मान्यवरांनी रॉयल कारभार ग्रुपचे कौतुक केले आहे. पुढील आठवड्यात खटाव -माण तालुक्यात कोविड केंद्र व आयसुलेसन सेंटर मध्ये रुग्ण व रुग्णाच्या नातेवायकाना मोफत जेवण पुरवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती रॉयल कारभार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सौरभ दादा जाधव यांनी दिली आहे.