युवा उद्योजक उत्कृष्ट बांधकाम व्यावसायिक पुरस्कार धैर्यशील कोळेकर यांना प्रदान
News By : Wai
वाई : सातारा जिल्ह्याच्या औद्योगिक आणि कृषी विकासाला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (MACCIA) यांच्या वतीने ‘गाव तिथे उद्योजक’ या उपक्रमांतर्गत ‘उद्योग संवाद परिषदे’मध्ये दि. २८ रोजीबांधकाम व्यावसायिक पुरस्कार धैर्यशील कोळेकर यांना प्रदान रोजी करण्यात आला
वाई येथील सोनगीरवाडी (ग्रामीण) परिसरातील मधुरा ॲग्रो टुरिझम, बावधन रोड, येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव (पाटील), जिल्हा परिषद अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष तथा ‘गाव तिथे उद्योजक’ अभियानाचे प्रवर्तक रविंद्र माणगावे होते
यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते
उद्योजक, व्यावसायिक आणि शेतकरी यांना एकत्र आणणे, त्यांच्या अनुभवांची व यशोगाथांची देवाणघेवाण करणे, उद्योग व कृषी क्षेत्रातील नव्या संधींची ओळख करून देणे तसेच स्थानिक उद्योग आणि व्यवसायांना प्रोत्साहन देणे ही या परिषदेचे उद्दिष्ट होते
‘चला, संवादातून संधी निर्माण करूया!’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील उद्योजकता, कृषीपूरक व्यवसाय आणि औद्योगिक विकासाला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांतर्फे व्यक्त करण्यात आला


