फलटण शहरात दोन महिन्यांपासून जबरी चोरी करणारा चोरटा जेरबंद
News By : Muktagiri Web Team
गेली दोन महिन्यांपासून शहरातील स्वामी विवेकांनद नगर, अनंत मंगल कार्यालय, महाराजा मंगल कार्यालय या भागात मोपेड मोटार सायकलवरून जाणार्या महिला व मुलीच्या हातातील पर्स, अथवा गाडीचे बास्केट, हॅण्डेलला लावलेली पर्स उचलून व जबरदस्तीने हिसकावून जाणार्या एका आरोपीस व त्याकडून मुद्देमाल विकत घेणार्या तीन जणांना अटक करून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे.
फलटण : गेली दोन महिन्यांपासून शहरातील स्वामी विवेकांनद नगर, अनंत मंगल कार्यालय, महाराजा मंगल कार्यालय या भागात मोपेड मोटार सायकलवरून जाणार्या महिला व मुलीच्या हातातील पर्स, अथवा गाडीचे बास्केट, हॅण्डेलला लावलेली पर्स उचलून व जबरदस्तीने हिसकावून जाणार्या एका आरोपीस व त्याकडून मुद्देमाल विकत घेणार्या तीन जणांना अटक करून नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना यश मिळाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक अनोळखी 20 ते 22 वर्षे वयाचा अंगाने सडपातळ असणारा चोरटा मोटारसायकल वरून शहरातील स्वामी विवेकांनद नगर, अनंत मंगल कार्यालय, महाराजा मंगल कार्यालय या भागात महिला व मुली यांचा पाठलाग करीत त्यांचे पाठोपाठ मोटारसायकल चालवित जात असून, बाजूला तसेच मागे-पुढे कोण नाही, हे पाहून संधी मिळताच महिला व मुलीच्य हातातील पर्स, अथवा गाडीचे बास्केट, हॅण्डेलला लावलेली पर्स उचलून व जबरदस्तीने हिसकावून घेऊन जात असे याशिवाय रस्त्याने मोबाईल फोनवर बोलत जाणार्या महिला व मुलींच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने ओढून पोबारा करीत होता.
शहरातील सदरच्या चोर्या तो साधारणपणे आठ दिवसांच्या फरकाने सातत्याने करीत होता. फलटण शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुमारे आठ ते दहा दिवसांपासून दररोज सायंकाळी 6 ते 8.30 यावेळेत वरील भागात रिक्षामध्ये स्पिकर लावून विशेषत: महिला व मुली वर्गामध्ये एक अनोळखी चोरटा वय अंदाजे 20 ते 22 वर्षे वयाचा महिलांच्या जवळील बॅग, पर्स, मोबाईल तसेच गळ्यातील मंगळसूत्र व गंठण जबरदस्तीने हिसकावून चोरून नेत असल्याबाबत सर्वांनी सावधान राहून दक्षता घ्यावी तसेच सदरबाबत त्यांनी आपले स्वत: चा मोबाईल नंबर व पोलीस ठाण्याचा नंबर देऊन असा काही प्रकार घडल्यास किंवा कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांचे नाव जाहीर न करता गोपनीय ठेवण्यात येईल या अटीवर जाहीर करत जनजागृती करून आव्हान करण्यात आले होते.
सदर मोटारसायकल वरील अज्ञात चोरट्यांची माहिती प्राप्त करून दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी महिला व मुलींना टार्गेट करून, गाडीच्या बास्केटमध्ये ठेवलेली पर्स तसेच मोबाईलवर बोलत असताना व हॅण्डलला लावलेली पर्स उचलून व मोबाईल हिसकावून घेऊन जाणारा अज्ञात चोरटा हा मोटारसायकल क्र. (एमएच 11 सीएफ 7259) वरून त्याच पद्धतीने गुन्हे करण्यासाठी येत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने फलटण शहर पोलीस ठाण्यातील फलटण शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. गायकवाड, सहायक फौजदार एस. एन. भोईटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही. पी. ठाकूर, पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. एस. भोईर, पोलीस नाईक एस. डी. सूळ, पोलीस नाईक एन. डी. चतुरे, पोलीस नाईक एस. ए. तांबे, पोलीस नाईक लावंड, पोलीस शिपाई अच्युत जगताप यांनी महाराजा मंगल कार्यालय लक्ष्मीनगर फलटण येथे सापळा लावला असता माहितील वर्णनाप्रमाणे व मोटारसायकल वरील संशयित अज्ञात चोरटा मिळून आल्याने त्यांस मोठ्या शिताफीने पकडून त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव सुरेश रमेश कदम (वय 22, मूळ रा. धुळदेव, सध्या रा. ब्राह्मणगल्ली पाटणे यांचे चाळ, फलटण) असे सांगितले.
आरोपी सुरेश रमेश कदम यास ताब्यात घेऊन तपास केला असता त्याने सदर कालावधीत फलटण शहरातील लक्ष्मीनगर, संजीवराजे नगर, गोळीबार मैदान, स्वामी विवेकांनद नगर, अनंत मंगल कार्यालय या भागात एकूण मालमत्तेचे 9 गुन्हे त्यापैकी 3 जबरी चोरी व 6 चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आलेले असून, त्याच्या कब्जातून 2 लॅपटॉप तसेच एकूण 11 मोबाईल हॅण्डसेट व एक मोटारसायकल तसेच रोख रकमेसह एकूण 2 लाख 24 हजार 800 रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
तसेच चोरीचा मोबाईल, हॅण्डसेट, लॅपटॉप घेणार्या तीन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. आशिष हेमंत अहिवळे (वय 20, रा. सोमंथळी, ता. फलटण), मयूर संजय साळवे (वय 20) व सौरभ संभाजी जाधव (वय 20, दोन्ही रा. सुरवडी, ता. फलटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
तिन्ही आरोपींकडून आणखी तीन मोबाईल हॅण्डसेट हस्तगत करण्यात आले असून, त्याबाबत अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव अतिरिक्त कार्यभार फलटण उपविभाग गणेश किंद्रे व उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहायक पोलीस निरीक्षक एन. आर. गायकवाड, सहायक फौजदार एस. एन. भोईटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही.पी.ठाकूर, आर. एस. भोईर, पी. एस. मदने, एस. डी. सूळ, एन. डी. चतुरे, एस. ए. तांबे, ए. एम. वाडकर, एन. पी. भोसले, व्ही. के.लावंड, ए. एस. जगताप, डी. डी. नाळे यांनी केली आहे.
याबाबत स्वतः पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर माहिती दिली.