सुर्याचीवाडीनजीक भीषण अपघातात चार ठार , चार गंभीर जखमी
Published:3 y 1 d 2 hrs 3 min 22 sec ago | Updated:3 y 1 d 2 hrs 3 min 22 sec ago
News By : Muktagiri Web Team
सुर्याचीवाडी ( ता. खटाव ) येथे आज सकाळी सहा वाजता चारचाकी गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार जण ठार आणि चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. खटाव तालुक्यातील बनपुरी आणि सिध्देश्वर कुरोली येथील एकूण आठ जण देवदर्शनासाठी निघाले होते. दहीवडी - मायणी रस्त्यावरील सुर्याचीवाडी येथे पहाटे सहा वाजता सदर गाडी झाडावर आदळून भिषण अपघात झाला. अपघातात एक पुरुष आणि दोन महिला जागीच ठार झाल्या. जखमींना वडूज आणि सातारा येथील रुग्णालयांमध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरु असताना वडूज येथील रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांमध्ये दहीवडी येथील एका प्रवाशाचा समावेश आहे.