घरोघरी विराजमान झालेल्या अकरा दिवसांच्या बाप्पांना पुसेसावळी परिसरामध्ये भक्तिभावाने निरोप देण्यात आला.
पुसेसावळी : घरोघरी विराजमान झालेल्या अकरा दिवसांच्या बाप्पांना पुसेसावळी परिसरामध्ये भक्तिभावाने निरोप देण्यात आला.
विघ्नहर्ता गणरायाचे उत्साहात आगमन झाले होते. सध्या कोरोनाचे संकट असले तरी श्रींच्या आगमनामुळे वातावरण मंगलमय झाले होते. यावर्षी मंडळांकडून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. त्यामुळे यंदाच्या उत्साहात कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम दिसून आला नाही. पुसेसावळी परिसरामध्ये मंडळांनी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सार्वजनिक गणपती न बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सजावट, देखावे, मिरवणुका यावर्षी पाहायला मिळाल्या नाहीत.
नागरिकांनी गर्दी टाळून शासनाच्या नियमांचे पालन करत ‘गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर’च्या जयघोषात गणरायाला निरोप दिला.