माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम राबवत माण तालुक्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान केला.
बिजवडी : माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आगळावेगळा उपक्रम राबवत माण तालुक्यातील कर्तबगार महिलांचा सन्मान केला.
माण तालुका विविध क्षेत्रात प्रगती करत असताना यामध्ये महिला वर्गाचे देखील योगदान आहे. विशेष करून शिक्षण क्षेत्रात अनेक महिला शिक्षिका उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी सतत धडपडणार्या काही महिला शिक्षिकांचा माण तालुका प्राथमिक शिक्षक संघाने महिला दिनाचे औचित्य साधून त्यांच्या घरी जाऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला.
यावेळी माण पंचायत समितीच्या सभापती कविता जगदाळे, माजी नगराध्यक्ष साधना गुंडगे, गटशिक्षणाधिकारी सोनाली विभुते, शिक्षक बँकेचे व्हा. चेअरमन महेंद्र अवघडे, विस्तार अधिकारी संगीता गायकवाड यांची उपस्थिती होती.
अंजली खाडे, वैशाली खाडे, सीमा मोहिते, सविता शिलवंत, स्वाती कुंभार, अनुसया गोरे, रंजना गोरे, सुनीता यादव, इंद्रायणी जवळ, भारती ओंबासे, छाया वाघमोडे, मीना बनसोडे, सुनीता पिसाळ, उर्मिला मदने, मनीषा ननावरे, रेखा जगदाळे, अलका कुलकर्णी या शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मोहनराव जाधव, सूरज तुपे, वर्षा देवकर, अंजली कट्टे, उषा जाधव, महेश माने, हरीष गोरे, रामभाऊ खाडे, दत्तात्रय कोळी, शशिकांत खाडे, दत्तात्रय वाघमारे, अजित गलांडे, दत्तात्रय गलांडे, राजाराम पिसाळ, नंदकुमार साखरे यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.