कराडमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या विकासासाठी निधी मिळावा, म्हणून भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुलबाबा भोसले सतत प्रयत्नशील होते. यासाठी त्यांनी वेळोवेळी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच शासनाकडे स्टेडियमचा विकास आराखडा सादर केला होता.
डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीला यश आले असून, महायुती सरकारने 96.50 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. त्यामुळे छ. शिवाजी महाराज स्टेडियमचा कायापालट होणार असून, लवकरच क्रिडाप्रेमींना सर्वसोयींनियुक्त स्टेडियम उपलब्ध होणार आहे.