कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात वळवाचा धुवाधार पाऊस

घेवडा, बटाटा, सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान; शेतातील बांध, नालाबडिंगची फुटाफूट
Published:6 y 18 hrs 1 min 48 sec ago | Updated:6 y 18 hrs 1 min 48 sec ago
News By : Muktagiri Web Team
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात वळवाचा धुवाधार पाऊस

शेतकर्‍यांची घेवडा काढणीची लगबग सुरू असताना, काल कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात आसनगाव, अनपटवाडी, राऊतवाडी, शहापूर व परिसरात तब्बल अडीच तास ढगफुटी सारखा वळवाचा पाऊस पडल्याने उत्तर भागातील पिकांचे आणि शेताचे मोठे नुकसान झाले आहे.