शॉपिंग सेंटरमधील पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली

गुरेघर येथील घटना : 4 हजार 200 रुपयांचा ऐवज लंपास; परिसरात घबराट
Published:5 y 7 m 13 hrs 33 min 24 sec ago | Updated:5 y 7 m 13 hrs 33 min 24 sec ago
News By : Muktagiri Web Team
शॉपिंग सेंटरमधील पाच दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली

गुरेघर (ता. महाबळेश्‍वर) येथील मॅप्रो गार्डन समोर असणार्‍या शॉपिंग सेंटरमधील पाच दुकानांचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटून दुकानातील 4 हजार 200 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.