सडावाघापूर रस्त्यावर कार ३०० फूट खोल दरीत कोसळली
अपघातात वीज कर्मचारी शहाजी भिसे जखमी
Published:Dec 14, 2023 08:20 PM | Updated:Dec 14, 2023 08:20 PM
News By : पाटण | विद्या म्हासुर्णेकर
पाटण : पाटण शहरापासून काही अंतरावर असलेल्या म्हावशी , गुजरवाडी सडावाघापूर रस्त्यावर घाटात टेबल लँड परिसरात मारुती अल्टो वाहन तीनशे फूट खोल दरीत कोसळले असून यात वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शहाजी व्यंकट भिसे वय ४५ रा . नवारस्ता तालुका पाटण हे जखमी झाले आहेत तर वाहनाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे . याबाबत अधिक माहिती अशी गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास शहाजी भिसे हे आपल्या कामासाठी सडा वाघापूरच्या रस्त्याने निघाले होते , त्यांच्याकडे मारुती अल्टो एम. एच. ५० ए . २१७३ हे वाहन होते व ते स्वतः गाडी चालवत होते . दरम्यान अचानक त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने अल्टो कार बाजूला असलेल्या दरीत खोलवर जवळपास ३०० फूट खाली कोसळली . यात शहाजी भिसे हे जखमी झाले तर पलट्या खात गाडी खोल दरीत पडल्याने वाहनाचा चक्काचूर झाला आहे . घटनेची माहिती मिळतात तात्काळ स्थानिक नागरिक व पाटण घटनास्थळी पोहोचले . पोलिस व ग्रामस्थांच्या मदतीने शहाजी भिसे यांना दरीतून बाहेर काढून तात्काळ रुग्णवाहिकेतून कराड येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे . यामध्ये गाडीचा पुर्णपणे चक्काचूर झाला आहे .