कराडात तीन बांगलादेशी नागरिकांना अटक

घुसखोरी मार्गाने भारतात प्रवेश करून राहत होते कराडलगत ; वास्तव्य देणाऱ्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
Published:6 m 2 hrs 22 min 20 sec ago | Updated:6 m 2 hrs 22 min 20 sec ago
News By : Muktagiri Web Team
 कराडात तीन बांगलादेशी नागरिकांना अटक

कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय भारत बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून मुंढे येथील सह्याद्रि रेसीडेन्सी येथील चौथ्या मजल्यावर वास्तव्यास असल्याचे आढळून आले. त्यातील तिघा बांगलोदशी नागरिकांना कराड शहर पोलिसांनी अटक केली आहे. तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे. या बांगलोदशी नागरिकांना वास्तव्य देणाऱ्या मुंढे येथील करण बापू कांबळे याच्यावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.