क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणार असून, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. हा महिला शिक्षण दिन संपूर्ण भारतात साजरा व्हावा यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे अन्न अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचे कार्य ऊर्जा व प्रेरणा देणार असून, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. हा महिला शिक्षण दिन संपूर्ण भारतात साजरा व्हावा यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे अन्न अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
प्रारंभी नायगाव (ता. खंडाळा) येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास ना. भुजबळ यांनी अभिवादन करून पुरातत्व विभागाने सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित उभारलेल्या स्मारक व चित्रशिल्पाची पाहणी केली. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आ. मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, माजी खासदार समीर भुजबळ, खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे यांनीही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास अभिवादन केले.
फुले दाम्पत्यांनी समाज परिवर्तनाचे मोठे काम केल्यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबर काम करीत आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अखेरच्या श्वासापर्यंत लोकांसाठी काम करीत राहिल्या. त्यांच्या कार्याचाही गौरव ब्रिटीश सरकारने केला. महाराष्ट्र शासनाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात ‘महिला शिक्षण दिन’ साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम घेऊन फुले दाम्पत्यांनी केलेल्या कार्याचीही माहिती सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचेही ना. भुजबळ यांनी शेवटी सांगितले.
आज प्रत्येक क्षेत्रात महिला काम करीत आहेत, हे फक्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्ष व त्यागातून शक्य झाले. अनेक अडचणींवर मात व समस्यांना तोंड देऊन त्यांनी आपले काम अखंड सुरू ठेवले. त्यांचा जन्म दिवस आता ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून महाराष्ट्रात साजरा होणार आहे. आत्ता लागलेल्या शालेय, महाविद्यालयीन निकालांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. फुले दाम्पत्यांचे काम काम ऊर्जा व प्रेरणा देणार असून महाराष्ट्रातील एकही मुलगी शाळाबाह्य राहणार नाही, यासाठी प्रयत्न करू. त्यांचे विचार गाठीशी बांधून कार्य करू, असे सांगून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जनतेला शेवटी शुभेच्छा दिल्या.