वडूज : गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद सण उत्सव शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडावेत, कुठेही कायदा व सोयीचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता उत्सवाच्या अनुषंगाने यापूर्वी गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांवर वडूज पोलीस ठाणे हद्दी तील २२ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वडूज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी वडूज पोलिस ठाण्याकडून हद्दपारिचे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्या अनुषंगाने हद्दीतील 22 इसमांवर गणेश उत्सव कालावधी करिता उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर यांचे आदेशाने हद्दपारची नोटीस काढण्यात आली होती . त्याची मुदतीत बजावणी करून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा, वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा , अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली घनश्याम सोनवणे पोलीस निरीक्षक, वडूज पोलीस ठाणे, पोलीस हवालदार शिवाजी खाडे, सत्यवान खाडे, सागर बदडे, भार्गव पवार, पुष्कर जाधव यांनी कारवाई केलेली आहे.