सैदापूरात देशी विदेशी दारु जप्त

Published:Apr 28, 2021 09:12 PM | Updated:Apr 28, 2021 09:12 PM
News By : Muktagiri Web Team
सैदापूरात देशी विदेशी दारु जप्त

शहरालगत असणार्‍या सैदापूर गावच्या हद्दीत शाहूपुरी ते दिव्यनगरी जाणार्‍या रस्त्यावर आंब्याच्या झाडाच्या आडोशाला साडेसातशे रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी आदित्य संजय मोहिते (रा. दिव्यनगरी, ता. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला.