मोरणा विभागात मोरगिरी याठिकाणी सहारा युथ फाऊंडेशन, हिंदू एकता संघटना, मोरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानाने छ. शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. सहारा युथ फाउंडेशन या ग्रुपच्या माध्यमातून "जगुया थोडं दुसर्या साठी" या ब्रीद वाक्याचा बोध येऊन हा युवकांचा ग्रुप वर्षभर रक्त पुरवत असतो. केवळ आपल्या भागापुरते मर्यादित न राहता तालुक्यातील, जिल्ह्यातील किंबहुना मुंबई पुणे येथे असणार्या आपल्या बांधवांसाठी वेळेचे बंधन न पाळता ते कार्य करत आहेत.
रक्ताची गरज असलेल्या व्यक्ती ला तात्काळ रक्त देण्यासाठी या युवकांची धडपड असते. शिवजयंती चे अवचीत्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी दि 19 फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगिरी या ठिकाणी सकाळी 9 ते 2 या वेळेमध्ये रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. कोरोना नियमांचे पालन करत, मास्क, सँनिटायझर व सुरक्षित अंतर राखत हा कार्यक्रम होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.