कराड ः खरं तर असे कुठलेच क्षेत्र नाही की ज्यात महिला नाहीत. मुलींच्या बाबतीत ग्रामीण भागात एकेकाळी बाहेर पाठवायला नकार असायचा. विशेषतः सैन्यदलात महिला सहभागी होण्याचे प्रमाण अल्प आहे. कोळे ता. कराड येथील भूमीकन्या शकिला आमीर शेख हिने बॉर्डर सिक्युरिटी फोर्स दलात रूज होत सैन्य दलातील कराड तालुक्याची पहिली कन्या ठरली आहे.
कोळे ता. कराड येथील ग्रामस्थांनी शकिला शेख हिचे निवडीनंतर गावातून जल्लोषी वातावरणात मिरवणूक काढली आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशातील लेकींनी सैन्यदलात बिनधास्त सामील व्हा. देशसेवा ही काळाची गरज आहे. करियर करण्यासाठी सैन्यदलात खूप संधी आहेत. अनेक महिलासैनिकांचा आदर्श इैवून ही भरारी घ्यावी असे मतही शकिला शेख हिने व्यक्त केले आहे.