मुक्तागिरी वृत्तसेवा कराड, दि 3 ः हिंदु एकता आंदोलनचे सातारा जिल्हाध्यक्ष, प्रखर हिंदुतत्वावादी विक्रम पावसकर यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे यांनी ही निवड जाहीर केली असून या निवडीमुळे सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी व हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हिंदु एकता आंदोलनाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून विक्रम पावसकर यांनी सर्वसामान्यांसाठी कार्यरत आहेत. भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्षपदासह प्रदेश सचिवपदापर्यंतच्या त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. याचबरोबरच एक प्रमुख हिंदुतत्ववादी म्हणून त्यांची ओळख असून हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून प्रतिवर्षी राज्यात लौकिक असलेली भव्य शिवजयंती मिरवणुक त्यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात येते. सातारा जिल्ह्यासह राज्यात पक्षाचे मजबुत संघटन करण्यासाठी त्यांचे असलेले प्रयत्न पाहून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.