सशाच्या शिकारीप्रकरणी दोघांना अटक
News By : कराड | संदीप चेणगे
कराड ः जखिणवाडी (ता. कराड) येथे वनक्षेत्राच्या लगत शिकार करताना दोघांना रंगेहात पकडून अटक करण्यात आली आहे. वनविभागाने शुक्रवारी (दि. 7) रात्री 8 च्या सुमारास ही कारवाई केली आहे. संशयितांनी शिकारीसाठी तीन वाघरी लावल्या होत्या. यापैकी एका वाघरीमध्ये मृतावस्थेत ससा आढळला आहे.
संतोष शिवाजी बनसोडे (वय 21, रा. बाबाजीनगर, जखिणवाडी), पांडुरंग धोंडीराम नाईक (रा. भोसले कारखाना, जखिणवाडी, ता. कराड) असे अटक करण्यात आलेली आरोपींची नावे आहेत.
याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार (दि.07 ) जखिणवाडी राखीव वनक्षेत्राच्या लगत खाजगी क्षेत्रात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टी. डी. नवले, वनक्षेत्रपाल कराड, ए. पी. सवाखंडे, वनपाल मलकापूर, आर. एन.जाधवर, वनरक्षक मलकापूर,ए.एस.सोळंकी, वनरक्षक नांदगाव, ए. व्ही. पाटील, वनरक्षक अंतवडी, यु.एम.पांढरे,वनरक्षक ओगलेवाडी, योगेश बडेकर असे सर्वजण मिळून जखिणवाडी लगतच्या खाजगी क्षेत्रात रात्री 8 वा.च्या सुमारास गस्त करीत असताना, वेगवेगळया तीन ठिकाणी वाघरी लावलेले आढळले. तीन ही वाघरींची पाहणी केली असता त्यातील एका वाघरी मध्ये ससा (मादी) -1 मृत अवस्थेत अडकलेली दिसली. त्यानंतर आजुबाजूच्या परिसरामध्ये पाहणी केली असता, तेथे एका ठिकाणी बांयडींग तारेची फासकी लावलेली आढळली. उर्वरीत दोन मोकळया वाघरी व बांयडिंग तारेची फासकी काढून ताब्यात घेतली. त्यानंतर ज्या वाघरीत ससा अडकला होता त्या वाघरीच्या परिसरात वरील सर्व वनअधिकारी कर्मचारी दबा धरुन बसले होते. त्यानंतर रात्री 8 वा च्या सुमारास सदर वाघरीकडे दोन व्यक्ती हातातील बॅटरी घेवून येत असताना दिसले. त्या दोन्ही व्यक्तींनी वाघरीतील मृत ससा काढून घेवून जात असताना त्यांच्यावर धाड टाकून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपी संतोष शिवाजी बनसोडे (वय 21 वर्षे सध्या रा. बाबाजी नगर, जखीणवाडी ता.कराड), पांडूरंग धोंडीराम नाईक मुळ (रा.पोहाळवाडी ता.पन्हाळा जि.कोल्हापूर (सध्या रा.भोसले कारखाना, जखीणवाडी ता.कराड). वरील दोन्ही आरोपींकडून वाघरी- 3 नग, बांयडिंग तारेची फासकी- 1 नग जप्त करुन मृत सशाला ताब्यात घेतले. सदर प्रकरणाचा पुढील तपास महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, सातारा वनविभाग यांचे मार्गदर्शनाखाली महेश झांजुर्णे, सहाय्यक वनसंरक्षक (वनी.व कॅम्पा),सातारा व तुषार नवले,वनक्षेत्रपाल कराड हे करीत आहेत. वन्यजीव अपराध संबधी माहिती वनविभागाचे टोल फ्री क्र.1926 या हेल्प लाईन वर देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.