मलकापूर शहरात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोना आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच खुनाची घटना घडल्याने संपुुर्ण मलकापूर, आगाशिवनगर परिसर हादरला. खून झालेल्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती. दिवसभर शहरात या प्रकाराची चर्चा सुरू होती.
कराड तालुक्यातील मलकापूर येथे महिलेचा खून झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. मंगल दाजी येडगे रा.मलकापूर ता. कराड असे मृत महिलेचे नाव आहे. खून प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
मलकापूूर ता. कराड येथे शिवाजी चौक परिसरात येडगे कुटूंब रहात आहे. रविवारी सकाळी त्यांच्या घरात काही तरी विपरित घडल्याची चर्चा सुरू होती. स्थानिक नागिकांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. पोलीस निरिक्षक सराटे, हवालदार पन्हाळे, हवालदार बर्गे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी येडगे यांच्या घरात जावून पाहिले असता मंगल येडगे यांचा मृतदेह पडलेला होता. येडगे यांचा खून झाल्याचे तपासात स्पष्ट होताच पोलिसांनी चौकशी सुरू केली. दरम्यान मंगल येडगे यांचा त्यांच्या पतीने खून केल्याचा संशय आल्याने पोलिसांनी पती दाजी येडगे याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. वैयक्तिक वादातून मंगल येडगे यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त होत असून याप्रकरणी कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.