पाटण ः महिला, अल्पवयीन मुलींवरील अत्याचार्या घटनांनी पाटण तालुका हादरला आहे. गत महिन्यापूर्वी मुलीवरील अत्याचाराची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर लगेचच कोयना परिसरातील पंधरा वर्षीय मुलीवर अत्याचाराची घटना उघडकीस आल्यामुळे जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पीडीत मुलगीही नऊ महिन्याची गर्भवती असून याबाबत कोयना पोलीस ठाण्यात अल्पवयीन युवकावर गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अश, कोयना परिसरातील एका गावातील पंधरा वर्षीय युवतीवरती अल्पवयीन युवकांने अत्याचार केला. सदर अत्याचारानंतर पीडिता युवती नऊ महिन्यांची गरोदर आहे. सदर घटना कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी कोयना पोलीस स्टेशनला धाव घेतली. तद्नंतर कोयना पोलीसांनी अल्पवयीन संशयिताला घेतले ताब्यात आहे. पोक्सो अंतर्गत सदर युवकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु सदर आरोपी हा अल्पवयीन असल्याने आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेनंतर कोयना भाग हदरून गेला असून पाटण तालुक्यातील गुन्हेगारी च्या बाबत पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेला उधान आले. सदर घटनेचा तपास कोयनानगर पोलिस स्टेशन चे पोलिस उपनिरीक्षक गायकवाड हे करत आहेत.
9 months zale tri ghari kalale nahi gharch zopa kadht hote ka