कराड ः येथील मातोश्री ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष नवाज सुतार यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते मुंबई येथे मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात नवाज सुतार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकारी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी व पक्षाची ध्येयधोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्यासाठी सहकार्य करतील, असा विश्वास मंत्री बाळासाहेब पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या मान्यतेने, मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, व युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या पुढाकाराने नवाज सुतार ही निवड झाली आहे. निवडीमुळे कराड शहर व परिसरातील राष्ट्रवादी प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून निवडीबद्दल त्यांचे विविधस्तरातून अभिनंदन होत आहे.