देशातील सर्वोत्कृष्ट जिल्हा बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा गौरव
News By : Muktagiri Web Team
सातारा : अविज पब्लीकेशन, कोल्हापूर आणि गॅलेक्सी इन्मा प्रा. लि., पुणे यांचेवतीने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस ‘बँको ब्ल्यु रिबन २०२२' हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महाबळेश्वर येथे मान्यवरांचे उपस्थितीमध्ये प्रदान करणेत आला. तज्ञ समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार सातारा जिल्हा बँकेस या पुरस्काराने सन्मानित केले. बँको, देशभरातील जिल्हा बँका, अर्बन बँका, ग्रामीण बँका या सहकारी क्षेत्रातील बँकांचे कामाचे मुल्यमापन बँकोचे ज्युरीमार्फत करुन दरवर्षी विविध पुरस्काराने सन्मानित करते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूणच उत्कृष्ठ कामकाज आणि रुपये ७५०० कोटीचे वर ठेवी असलेल्या देशातील जिल्हा बँक श्रेणीमधून सातारा जिल्हा बँकेची प्रथम क्रमांकाचे पुरस्कारासाठी सन्मानित करणेत आले. सदर पुरस्कार अविज पब्लीकेशनचे मुख्य संपादक श्री. अविनाश शिंत्रे गुंडाळे, गॅलेक्सी इन्माचे संचालक श्री. अशोक नाईक यांचेमार्फत NAFCUB संस्थेचे अध्यक्ष श्री. ज्योतिन्द्रभाई मेहता यांचे हस्ते बँकेचे अध्यक्ष श्री. नितिन पाटील, उपाध्यक्ष श्री. अनिल देसाई, संचालक श्री. प्रभाकर घार्गे, श्री. दत्तानाना ढमाळ, श्री. राजेंद्र राजपुरे, श्री. प्रदीप विधाते, श्री. शिवरूपराजे खर्डेकर, माजी संचालक श्री. राजेश पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक श्री. राजेंद्र भिलारे, उपव्यवस्थापक श्री. उद्धव देशमुख, अधीक्षक श्री. रविंद्र उंबरकर यांनी पुरस्कार स्वीकारला. या संस्थेने बँकेस सन २०१३ पासून आजपर्यंत ‘बेस्ट परफॉर्मन्स’ व ‘बेस्ट टेक्नॉलॉजी’ ‘बेस्ट आय टी सेंटर, अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. श्री. ज्योतिन्द्रभाई मेहता यांनी सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये आदर्श असणारी बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विशेष उल्लेख केला. या पुरस्काराबद्दल बँकेचे जेष्ठ संचालक व विधानपरिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, या पुरस्कारांमुळे बँकेच्या लौकीकामध्ये आणखी भर पडली आहे. आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ट कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. श्री. नितिन पाटील म्हणाले, जिल्हयातील सर्वसामान्यांचे आर्थिक उन्नतीसाठी राबवित असलेल्या विविध कर्ज योजना, कर्ज वसुलीबाबत सतर्कता, प्रभावी वसुली यंत्रणा, ठेवी व कर्जे यामधील लक्षणीय वाढ, उत्कृष्ट निधी नियोजन, ‘शून्य’ टक्के निव्वळ एन. पी. ए., दर्जात्मक कामकाज, गुणवत्ता व आधुनिक बँकिंगव्दारे ग्राहकाभिमुख सेवा यामुळे आयएसओ ९००१-२०१५ मिळालेले मानांकन, तसेच सामाजिक बांधिलकी कायमच जपत असलेने बँकिंग क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमठविलेला आहे. श्री. अनिल देसाई म्हणाले, सहकारी बँकिंग क्षेत्रात आपल्या बँकेचे कामकाज दीपस्तंभासारखे आहे. नुकतेच गुणवतापूर्ण कामकाजामुळेच बँकेला दशकातील उत्कृष्ठ बँक म्हणून NAFSCOB या संस्थेने गौरविले असून सदर पुरस्कार केंद्रीय गृह व सहकार मंत्री ना. अमित शहा यांचे हस्ते प्रदान करणेत आला आहे. डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, मा. संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय-धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हयातील सर्वसामान्य शेतक-यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांच्या सदिच्छा यामुळेच बँक प्रगतीपथावर पोहोचली आहे. बँकेने राखलेला शुन्य टक्के एन .पी .ए ., १००% कर्जवसुली, उत्तम व्यवस्थापन, नाबार्ड व आर .बी .आय . चे नियमांचे काटेकोर पालन तसेच बँकींग व्यवसायातील विविध रेशो बँकेने राखले आहेत. बँकेच्या सर्वंकष उत्कृष्ट कामकाजामुळे बँकेस शासकीय, निमशासकीय, सहकारी, खाजगी अशा विविध नामांकित संस्थांकडून आजअखेर १०३ पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. या पुरस्काराबद्दल बँकेचे संचालक खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, माजी सहकार व पणन मंत्री मा. आ. श्री. बाळासाहेब पाटील, आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील व सर्व संचालक सदस्य, यांनी अभिनंदन केले. बँकेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांनी बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .