पाटण शहरानजीक संत निरंकार भवन शेजारी असणार्या इमारतीमध्ये गेली अनेक वर्ष भाड्याने राहत असलेल्या बाँबी विक्रेत्याचा खून झाला असल्याची प्राथमिक माहिती उघडकीस आली आहे.
गेली अनेक वर्ष पाटणसह परिसरात बाँबी विक्रीचा धंदा करणारा रमण तेवर उर्फ आण्णा याचा तो राहत असलेल्या इमारतीच्या मागील बाजूच्या शेडामध्ये खूण झाल्याचे निदर्शनास आले आहे. इमारतीच्या मागील शेडामध्ये डोक्यामध्ये लोखंडी राँडने हल्ला करुन त्याच्या अंगावरती बाँबीचे पोते ठेवण्यात आले होते असं घटनास्थळावरुन समजले आहे.
सदर आण्णा हा परराज्यातील तमिळनाडू येथील असल्याचे समजते आहे. तसेच त्याची पत्नी दोन दिवसापूर्वी आपल्या मूळ गावी गेली आहे. त्याला दोन अविवाहित मुल व दोन विवाहित मुली आहेत. सदर घटनेची माहिती मिळताचं घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती. पाटण पोलिस स्टेशन चे अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत.