पाटण ः रोमनवाडी (येराड, ता. पाटण) येथे शेततळ्यात बुडून बहिण, भावाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे.
सौरभ अनिल पवार (वय 16) व पायल अनिल पवार (वय 14, रा. काठी, ता. पाटण) अशी बुडून मृत्यू झालेल्या दुर्दैवी बहिण भावंडांची नावे आहेत.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील रोमनवाडी येथील फार्म हाऊसवर सचिन जाधव हे कामास आहेत. जाधव यांच्याकडे पाहुणे अनिल पवार हे पत्नी व दोन मुलासमवेत आले होते. सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अनिल पवार यांचा मुलगा सौरभ व पायल शेततळ्याकडे गेले होते. यावेळी सौरभ पाण्यात बुडत असल्याचे पाहिल्यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना पायलही शेततळ्यात बुडाली. याबाबतची माहिती मिळताच सचिन जाधव व मुलांचे आई-वडीलांनी तळ्याकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोन्ही मुले पाण्यात बुडाली होती. त्यांचा शोध घेण्यासाठी मासेमारी करणार्यांना मुलांना बोलवण्यात आले. रात्री 7 च्या सुमारास त्या दोघांचे मृतदेह सापडले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील, पोलीस कर्मचारी, सरपंच प्रकाश साळुंखे, तलाठी पी. जी. शिंदे यांनी भेट दिली. घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसात झाली नव्हती.
????????????????????????