अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस तत्काळ अटक करावी

‘जनता क्रांती दला’ची निवेदनाद्वारे मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा
Published:5 y 1 m 1 d 3 hrs 15 min 41 sec ago | Updated:5 y 1 m 1 d 3 hrs 15 min 41 sec ago
News By : Muktagiri Web Team
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीस तत्काळ अटक करावी

खटाव तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीस तत्काळ अटक करून प्रकरण दडपणार्‍या अधिकारी आणि राजकीय पुढार्‍यावर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी आज जनता क्रांती दलाने केली आहे. याबाबत आज खटाव तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले. तसेच 26 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.