कराड ः भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. शनिवारी (दि.2) ही निवड प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केली आहे.
नरेंद्र पाटील यांचे सामाजिक, राजकीय व कामगार क्षेत्रातील योगदान तसेच स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या सामाजिक कार्याचा लाभलेला वारसा तसेच पक्ष संघटनेच्या कार्यवाढीसाठी ही निवड करण्यात आली असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे. तसेच नरेंद्र पाटील यांना पुढील कार्यास व नवसंवत्सराच्या (गुढीपाडवा) शुभेच्छा ही दिल्या.