कराडच्या मंडई परिसरात पोलिसांची मोठी कारवाई
कत्तलीसाठी आणलेली जनावरे घेतली ताब्यात
Published:Mar 29, 2024 10:04 AM | Updated:Mar 29, 2024 10:04 AM
News By : Muktagiri Web Team
कराड : येथील मंडई परिसरात शुक्रवारी सकाळी डी.वाय. एस. पी. अमोल ठाकूर यांच्या पथकाने एका कत्तलखान्यावर छापा टाकून कत्तलीसाठी आणलेले सुमारे 40 ते 50 जनावरे ताब्यात घेतली. याबाबत मिळालेली माहिती अशी कराड येथील मंडई परिसरात पहाटेच्या सुमारास कत्तलीसाठी 40 ते 50 जनावरे घेऊन आल्याची माहिती डीवायएसपी अमोल ठाकूर यांना मिळाली त्यानुसार डी वाय एस पी अमोल ठाकूर यांच्या पथकाने व कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या पथकाने मंडई परिसरात छापा टाकला असतात त्या ठिकाणी कत्तलीसाठी कत्तलखान्यात सुमारे 40 ते 50 जनावरे असल्याचे आढळून आले पोलिसांनी सर्व जनावरे ताब्यात घेऊन जनावरे ज्यांनी आणली त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे