॥जिथे आश्वासने थांबली, तिथून मकरंद पाटील यांनी विकासाचा नवा इतिहास घडवला॥

"तब्बल ४३ किलोमीटरच्या लांबी व १० मीटर रुंदीच्या सिमेंट काँक्रीट महामार्गासाठी ३५२ कोटींची भरीव मंजुरी”
Published:2 hrs 54 min 8 sec ago | Updated:2 hrs 54 min 8 sec ago
News By : Muktagiri Web Team
॥जिथे आश्वासने थांबली, तिथून मकरंद पाटील यांनी विकासाचा नवा इतिहास घडवला॥

: लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ घोषणा, आश्वासने आणि भाषणे नव्हेत; तर जनतेच्या वेदना स्वतःच्या समजून त्या शासनाच्या निर्णयात रूपांतरित करण्याची क्षमता होय. वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघासाठी मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद पाटील यांनी पुन्हा एकदा हे आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.वाई खंडाळा महाबळेश्वर या विधानसभा मतदारसंघाला तब्बल ३५२ कोटी रुपयांच्या निधीतून ४३ किलोमीटर लांबीचा १० मीटर रुंदीचा सिमेंट काँक्रीट रस्ता मंजूर करण्यात आला आहे.