राज्यातील तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात : 21 जून पर्यंत स्वीकारणार अर्ज

कराडच्या शासकीय महाविद्यालयात सुविधा केंद्र सुरू ः प्राचार्य पाटील
Published:Jun 13, 2023 02:16 PM | Updated:Jun 13, 2023 02:16 PM
News By : कराड | संदीप चेणगे
राज्यातील तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात : 21 जून पर्यंत स्वीकारणार अर्ज

संस्थेमध्ये अल्पसंख्यांक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन व मेकॅनिकल या अभ्यासक्रमांच्या स्वतंत्र तुकड्या उपलब्ध असून अल्पसंख्यांक प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के जागा राखीव असतात. परंतु अल्पसंख्यांक प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या अल्प प्रतिसादामुळे शिल्लक जागांवरती इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. अल्पसंख्यांक प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सदर राखीव जागांचा लाभ घेण्याचे आवाहन मा. प्राचार्य डॉ. राजेंद्र का. पाटील यांनी केले.