कराड-सैदापूर किरकोळ कारणावरून फायरिंगचा थरार
चिमुकली गंभीर जखमी; घटनास्थळी पोलीस पथक दाखल
Published:Dec 27, 2024 09:51 PM | Updated:Dec 27, 2024 09:52 PM
News By : Muktagiri Web Team
सैदापूर ता. कराड येथील ओम कॉलनी येथे किरकोळ कारणावरून फायरिंग झाल्याची घटना घडली. यामध्ये एक चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अशोक भापकर यांच्यासह कर्मचारी तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी फायरिंग करणाऱ्या एकास ताब्यात घेतले असून जखमी मुलीला उपचारासाठी हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे.