- मालखेड ता.कराड जि.सातारा येथील श्री . विष्णू लक्ष्मी मंदिर येथे श्री विष्णू लक्ष्मी सांप्रदायिक भक्ती सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक २४ नोव्हेंबर ते सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर रोजी केले आहे.
तरी ग्रामस्थांनी व पै-पाहुणे, नातेवाईक यांनी उपस्थित राहून नाम अमृताचा लाभ घ्यावा असे आवाहन मालखेड व जुने मालखेड ग्रामस्थ व भजनी मंडळ,तांबवेकर बंधू सर्व गणेश मंडळे , सर्व बचत गट, हरिपाठ मंडळ मालखेड यांनी केले आहे.
सदर सांप्रदायिक भक्ती सोहळ्याच्या निमित्ताने रविवारी दि.२४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.००वा. मालखेड ग्रामस्थांच्यावतीने सोंगी भजन भारूड या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तसेच यात्रेचा मुख्य दिवस सोमवार असून दि.२५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.००वा पालखी सोहळा व दुपारी १२ वा.महाप्रसादाचे आयोजन केले आहे.