सिद्धेश्वर कुरोली रस्त्याला झालेल्या अपघातात जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी चांगलीच धावपळ उडाली होती. आपल्या कामाच्या वेळ होऊन सुद्धा माणुसकीचे दर्शन त्यांच्या रूपाने भेटले. चालक व वाहक यांच्यासह प्रवाशांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती . त्यांच्या या प्रामाणिक कामकाजाबद्दल प्रवासी वर्गाने वाहतूक निरीक्षक गणेश राऊत यांच्यासह अधिकाऱ्याबद्दल समाधान व्यक्त केले.
वडूज / प्रतिनिधी
सातारा रहिमतपूर मार्गे वडूज कडे येणाऱ्या एसटी बसचा नायकाची वाडी फाट्या जवळ अपघात झाला . या अपघातात चालक भोसले व वाहक माने यांच्यासह चार प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. घटना घडल्यानंतर वडूज आगाराचे आगार प्रमुख प्रताप पाटील , वाहतूक निरीक्षक गणेश राऊत यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट दिली.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या अधिक माहिती नुसार गाडी क्रमांक एम एच ११ डी एल ९२६० ही गाडी साताऱ्याहून साडे सहा वाजण्याच्या सुमारास रहिमतपूर मार्गे वडूज कडे येत होती. दरम्यान गाडी नायकाचीवडी येथे आल्यानंतर बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस रस्त्यालगत असणाऱ्या चरित गेली. या अपघातात बस चालक श्री भोसले व वाहक श्री माने यांना दुखापत झाली .
तर बस मध्ये प्रवास करणारे काही प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच आगार प्रमुख प्रताप पाटील , वाहतूक निरीक्षक गणेश राऊत यांच्यासह अधिकाऱ्यांनी घटना स्थळी भेट दिली. यामध्ये जखमी प्रवासी यांना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.