निवासराव थोरात यांचा अर्ज वैध तर मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध
News By : कराड I संदीप चेणगे

कराड ः सह्याद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुक अर्ज छाननीत अवैध अर्ज ठरलेल्या दहा जणांनी प्रादेशिक साखर सहसंचालक नीलिमा गायकवाड यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्याचा निकाल आज मंगळवारी (दि. 18 मार्च) जाहीर झाला असून निवास थोरात यांच्या संबंधित नऊ जणांचे अर्ज वैध ठरले असून मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध ठरवला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना धक्का बसला असून विरोधी गटाला दिलासा मिळाला आहे.
एकूण दाखल झालेल्या 251 अर्जांची छाननी झाली. त्यातील 29 उमेदवारी अर्ज बाद झाले तर 205 उमेदवारी अर्ज ठरले होते. दाखल अर्जापैकी मानसिंगराव जगदाळे आणि निवासराव थोरात या दोघांच्या अर्जावर हरकत घेण्यात आली होती. त्यावरील निकाल निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांनी देत दोघांचेही अर्ज छाननीत बाद झाले होते.
सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीसाठी 251 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. त्याची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी संजय कुमार सुद्रिक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अपर्णा यादव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंध राहुल देशमुख, सहाय्यक निबंधक संजय जाधव यांच्या उपस्थितीत झाली. छाननीत 234 उमेदवारांच्या दाखल 251 उमेदवारी अर्जापैकी 205 उमेदवारांचे 218 अर्ज व ठरले तर 29 उमेदवारांचे 33 अर्ज ठरले अवैध ठरलेल्या 29 पैकी 26 उमेदवारांच्या अर्ज त्यांनी मागील पाच ऊस गळीत हंगामापैकी किमान तीन हंगामात कारखान्याला ऊस घातला नसल्याने अवैध ठरले आहेत. एक अर्ज उमेदवाराकडे सहकारी बँकेची थकबाकी असल्याने एक अर्ज कलम 88 अन्वये जबाबदारी निश्चित झाल्याने व एका उमेदवाराच्या अर्जावर सुचकाचा तपशील नसल्याने व अनुमोदक नसल्याने सदर अर्ज अवैध ठरले आहेत. त्यामुळे छाननी नंतर 205 उमेदवार शिल्लक राहिले होते उमेदवार अर्जाची इच्छांनी सुरू असताना मुरलीधर गायकवाड यांनी निवास थोरात यांच्या अर्जावर तर वसंतराव जगदाळे यांनी मानसिंगराव जगदाळे यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. त्याची सुनावणी निवडणूक निर्णय अधिकारी सुद्रिक यांच्यासमोर झाली. त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवास थोरात व मानसिंगराव जगदाळे यांचे दोन्ही अर्ज बाद झाल्याचा निकाल दिला होता. त्यावर प्रादेशिक साखर सहसंचालक श्रीमती गायकवाड यांच्याकडे संबंधितांनी अपील दाखल केले होते. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली त्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यामध्ये अपील दाखल झालेल्या दहापैकी निवास थोरात यांच्यासह नऊ जणांचे अर्ज वैद ठरले तर मानसिंगराव जगदाळे यांचा अर्ज अवैध ठरला आहे त्यामुळे सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे.