आयपीएलचा सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक; कराड शहर पोलिसांची करावाई

दैनिक मुक्तागिरीच्या वृत्तमालिकेचा इफेक्ट
Published:Mar 26, 2025 10:46 PM | Updated:Mar 26, 2025 10:46 PM
News By : Muktagiri Web Team
आयपीएलचा सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक; कराड शहर पोलिसांची करावाई

अटक केलेले दोघेही कराडातीलआयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले आहे. ते दोन्ही संशयित कराडातील असून संदीप संपत बडेकर व प्रथमेश बाळासाो कटरे अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांकडे पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून त्यानुसार तपासासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.