ठाणे, कळवा, कोपरी, वागळे इस्टेट व पाचपाखाडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात हरवलेले मोबाईल शोधून संबंधित मालकांना परत देण्यात आले.
कारवाई CEIR पोर्टलचा (Central Equipment Identity Register) वापर करून करण्यात आली
ठाणे शहरातील उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मोबाईल चोरी प्रकरणांवर लगाम लावत ठाणे शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १०५ हरवलेले मोबाईल परत मिळवले आहेत. ठाणे, कळवा, कोपरी, वागळे इस्टेट व पाचपाखाडी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात हरवलेले मोबाईल शोधून संबंधित मालकांना परत देण्यात आले.
ही कारवाई CEIR पोर्टलचा (Central Equipment Identity Register) वापर करून करण्यात आली असून, या पोर्टलवर मोबाईल चोरीची माहिती दिल्यास पोलीस ती शोधू शकतात.
राज्य पोलीस महासंचालकांच्या आदेशाने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत, एकूण ३५ मोबाईल ठाणे पोलीस स्टेशनकडून, २० कोपरी पोलीस स्टेशनकडून, २५ वागळे इस्टेट व २५ कळवा पोलीस स्टेशनकडून परत मिळवले गेले.
संपूर्ण मोहिमेचे मार्गदर्शन अतिरिक्त पोलीस आयुक्त (पश्चिम) डॉ. ज्ञानेश्वर पोळ, उपायुक्त फौजदार देशमुख, सहाय्यक आयुक्त भोसले आणि स्थानिक पोलिस निरीक्षकांनी केले.