सह्याद्री कारखाना निवडणुकीसाठी दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 50 टक्के मतदान
'या' केंद्रावर सर्वाधिक मतदानाची टक्केवारी
Published:15 hrs 32 min 37 sec ago | Updated:15 hrs 32 min 37 sec ago
News By : कराड I संदीप चेणगे
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी आठ वाजता मतदानास प्रारंभ झाला. सकाळी दहा वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यांमध्ये 19 टक्के मतदान झाले तर दुपारी बारा वाजेपर्यंत सरासरी 43 टक्के मतदान झाले आहे. एकूण 99 केंद्रांवर 32 हजार 205 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी चुरशीने मतदान होत असून अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर तांबवे, कडेपुर, वाठार किरोली या गावातील मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी सर्वाधिक आहे.