विंग ता. कराड येथे पती-पत्नीच्या झालेल्या किरकोळ वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित पतीस ताब्यात घेतले आहे. मयुरी मयूर कणसे (वय 27 रा. विंग ता. कराड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मयूर कणसे असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळास पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवारी विंग येथे राहणाऱ्या मयुरी कणसे व मयूर कणसे या पती-पत्नीत किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की पती मयूर कणसे याने पत्नी मयुरी हिचा गळा आवळून खून केला. याबाबत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी संशयित पती मयूर कणसे याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.